आयुष्य हे असंच जगायचं असतं Marathi Shayri
बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं,
जे घडेल ते सहन करायचं असतं,
आयुष्य हे असंच Marathi Shayri चालत असतं..
कुठून सुरु झालं हे माहित नसलं,
तरी थांबायचं कुठं हे ठरवायचं असतं,
आयुष्य हे असंच जगायचं असतं..
..कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं,
स्वत:च्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचं असतं,
आयुष्य हे असंच Marathi Shayri जगायचं असतं..
दू:ख आणि अश्रूंना मनात कोडून ठेवायचं असतं,
हसता नाही आलं तरी हसवायचं असतं,
आयुष्य हे असंच जगायचं असतं..
पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं,
आकाशात झेपावूनही धरतीला विसरायचं नसतं,
आयुष्य हे असंच जगायचं असतं..
मरणान समोर येऊन जीव जरी मागितला,
तरी मागून मागून काम मागितलं,
असंच म्हणायचं असतं.....
आयुष्य हे असंच जगायचं असतं....!!

Comments
Post a Comment